पुणे शहरात जी गावे यापूर्वी समाविष्ट झाली त्यांचे डीपी प्लॅन अद्याप तयार नाही परंतु मनपाकडून मोठ्या प्रमाणात कर नागरिकांकडून घेतला जात आहे. पुणे शहरात सहभागी झालेल्या ३२ गावातील नागरिकंनी ‘गाव विकणे’ असे आंदोलन नुकतेच केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिं
.
शिवतारे म्हणाले, चुकीचे कर नागरिकांना लावले गेल्याने ते कोणी भरत नव्हते. कायदेशीर प्रक्रिया योग्यप्रकारे राबवून कर कमी करण्यात आले आहे. मनपा सोईसुविधा पाणीपुरवठा, रस्ता, मलनिस्सारण या सुविधा संबंधित गावात मनपास उभारणी करावी लागेल. उरळी- फुरसुंगी नगरपालिका स्वतंत्ररित्या सुरु करण्यात येईल. महायुतीला केवळ निवडणुकीत फायदा होईल याकरिता हे निर्णय नसून सदर भागांचा विकास योग्यप्रकारे होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे.
शिवतारे म्हणाले, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मास आलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा कळणार नाही. निवडणुक आले की मतांचा जोगवा मागणाऱ्यांमागे फिरत न बसण्यापेक्षा महिलांना त्यांचा स्वत:चा अधिकार दिला गेला आहे. सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य सरकारने काम केले आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल. पुरंदर मध्ये माझे जावई माजी आयपीएस शिवदीप लांडे नाहीतर मुख्यमंत्री यांनी संधी दिल्यावर विजय शिवतारेच उमेदवार निवडणुकीत रहाणार आहे. महायुतीचे तीन नेते वेगवेगळया परिस्थितीत सक्षम असून ते योग्यप्रकारे निवडणुकीस सामोरे जातील. पक्ष नेतृत्वात शिवसेनेत बदल झाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के असल्याचे दिसून येत आहे.