चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली



रसिकांना खळखळून हसवणारे मराठीतील हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनाची बातमी समजताच सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिनेमा तसंच राजकीय क्षेत्रातून अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde)यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट 

चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट : “रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली दैदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.”

अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करत आदरांजली वाहिली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वाहिली आदरांजली

खासदार श्रीकांत शिंदे यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ट्वीट

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट

अमोल कोल्हे यांनी वाहिली आदरांजली

Web Title: CM eknath shinde and other political leaders condolence message on sad demise of actor Atul Parchure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24