दूध उत्पादक शेतकऱ्यांना नारळ व आंब्याची रोपे वाटप करताना नामदेव गाडेकर, राजेंद्र नागरे यांच्यासह उपस्थित शेतकरी.
विजयादशमीनिमित्त दूध उत्पादकांना आंबा व नारळाच्या एक हजार रोपांचे वाटप करण्यात आले. येथील शिवकृपा दूध डेअरीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा देवगिरी साखर कारखाना संस्थापक डॉ. नामदेवराव गाडेकर हे होते. तसेच सहायक आयुक्त
.
राजेंद्र नागरे यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. गाडेकर यांनी सांगितले की, शेतीला पूरक व्यवसाय हा दुग्धव्यवसायच आहे. अन्नधान्याबरोबर काही प्रमाणात फळबाग असली तर आर्थिक पाठबळ मिळेल व पर्यावरण संतुलन राहील. आता प्रत्येक शेतकरी हा दूध व्यवसायात आला आहे. यात फळबागसारखा व्यवसाय सुरू करावा. तंत्रज्ञान एवढे पुढे गेले की कोणताही व्यवसाय हा सोपा झाला. यासाठी सर्वच डेअरीचालकांनी शेतकऱ्यांना मदत करून नवीन तंत्रज्ञानाची माहिती द्यावी, असे डॉ. गाडेकर यांनी सांगितले. याबरोबर सहायक आयुक्त दयानंद पाटील यांनी सांगितले पर्यावरण संतुलनासाठी अन्न व औषध प्रशासनाने हा उपक्रम घेण्यासाठी शिवकृपा डेअरीस विनंती केली व त्यांनी हा उपक्रम राबवला. यातून एक हजार रोपांचे वाटप हे मूळ शेतकऱ्यांपर्यंत गेल्याने यातील एक ही रोप वाया जाणार नाही याची खात्री आज दिसून आली असे पाटील म्हणाले. याप्रसंगी राजेंद्र नागरे, नामदेव शिरसाठ, नरेंद्र सीमंत, अंबादास जाधव, बाबूराव शेरकर यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.