… तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले


Sanjay Raut On Congress: हरियाणात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. हरियाणातील पराभवाचा महाराष्ट्रात फटका बसू शकतो का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. कोणी स्वतःला मोठा भाऊ छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचे आहे. हरियाणाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. तीन पक्षांची आघाडी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

हरियाणाचा विजय फार मोठा महान व दैदिप्यमान नाही. आमच्या मतांमध्ये विभजन आहे. काँग्रेस पक्षाने या निकालाविरोधात काही तक्रारी केली आहेत. त्यावरही विचार व्हावा. लहान राज्य आहे जातीपातीची काही गणित असतात. काँग्रेसला 36 जागा मिळाल्या बहुमताला 45 जागा लागलात. 9 जागा कमी पडल्या. अर्थात आम्ही निराश झालेलो नाही. काँग्रेस पक्षाला देखील भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यायला हवी. मग इतर पक्षही त्यांच्या राज्यात त्या दृष्टीने भूमिका घेतील, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे. 

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याचा विचार करायला हवा. ज्या राज्यात काँग्रेसची बाजू कमजोर असते त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षाने एकत्र घेऊन निवडणुका लढवते. पण जिथे काँग्रेसची हवा आहे त्या ठिकाणी स्थानिक पक्षांना लांब ठेवते. त्यातूनच हरियाणासारखा निकाल येतो. हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता.  कांटे की टक्कर होऊ शकली असती काही पक्षांना त्या ठिकाणी महत्त्व देऊ शकले असते. त्या सर्वांनी चर्चा करून निवडणुकांना सामोरे गेले असते तर निकाल बदलू शकले असते, असं म्हणत राऊतांनी एकप्रकारे काँग्रेसचे कान टोचले आहेत.   

हरियाणाच्या निकालामुळं महाराष्ट्रात आमदार दुरुस्ती करता येईल. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसंदर्भात कुठलीही बार्गेनिंग पॉवर आम्ही करणार नाही. ठाकरे यांनी सांगितले ते शंभर टक्के सत्य आहे जम्मू कश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला चेहरा होता त्यांनी त्यांना मतदान केलं. हरियाणा मध्ये देखील असा चेहरा समोर आला असता तर चित्र वेगळं असतं, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात देखील तसंच आहे. आधी निवडणूका लढायच्या आणि नंतर नेता ठरवायचा हे लोकांच्या पचनी पडत नाही. या राज्याला चेहरा कोणता आहे हे स्पष्ट केले पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24