राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे अडीच कोटी महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र या योजनेमध्ये काही अपहार आणि गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. असाच काह
.
अकोला जिल्ह्यातील 6 पुरुषांनी नारीशक्ती दूत अॅपवर स्वत:चे आधार अपलोड करून संपूर्ण खोटी माहिती भरली होती. महिला व बालकल्याण विभागाला आधार सीडींगदरम्यान हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या सहा पुरुषांना नोटीस बजावत या सर्व प्रकाराचा खुलासा मागवला होता.
दोघांनी नऊ हजार केले परत, चौघांनी सादर केला खुलासा
प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर सहापैकी दोघांनी तीन महिन्यांचे आलेले प्रत्येकी 4 हजार 500 रुपये असे एकूण 9 हजार रुपये परत केले आहेत. या दोघांनी 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे रकमेचा चेक सोपवला आहे. तर लाडका भाऊ म्हणून चुकीने अर्ज भरला, असा खुलासा उर्वरित चौघांनी सादर केला आहे.
नांदेड येथे सीएससी केंद्र चालकाने हडपले बहिणींची पैसे
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील एका सीएससी केंद्र चालकाने आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे सुमारे 3 लाख रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना महिलांच्या आधारकार्डसोबत छेडछाड केली. पोर्टलवर महिलांचे आधारकार्ड नंबर टाकण्याऐवजी त्यांच्या पतीचे आधारकार्ड नंबर टाकले. त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आणि इतर योजनांचे पैसे आले आहेत, असे सांगून त्याने अनेकांचे आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक जमा करून घेतले.
याच कागदपत्रांच्या आधाराने त्याने महिलांच्या खात्यात आलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करून घेतले. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर आल्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आले आहेत, असे सांगून त्या केंद्र चालकाने पुरुषांचे अंगठे घेतले. त्यानंतर बँकेत जमा झालेली रक्कम काढून घेतली.
केंद्र चालकाने जवळपास ७१ जणांच्या आधार क्रमांकाचा वापर करून त्यांच्या परस्पर 3 लाख 19 हजार 500 रुपये उचलले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासानाने चौकशीचे आदेश दिले असून केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.