घरातील स्त्रियांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखणे, हेच शक्तीचे जागरण: अलका लांबा यांचे प्रतिपादन – Pune News



स्त्रीची प्रतिष्ठा आणि सन्मान तसेच सुरक्षा यांची ग्वाही मिळणे, हेच नवरात्र उत्सवातील शक्तीचे खरे जागरण ठरेल, असे मत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी व्यक्त केले. आपापल्या घरातील, कुटुंबातील स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा राखण्या

.

आबा बागुल आणि जयश्री बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार्या पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे नवरात्र महोत्सवाचे यंदा ३० वे वर्ष आहे.

यावेळी काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, काॅग्रेस संध्या सव्वालाखे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, आमदार संजय जगताप, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, पुणे शहर प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष संजय मोरे उपस्थित होते.

अलका लांबा यांनी राज्यात काही ठिकाणी घडलेल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख केला. ‘नवरात्र उत्सवात देवीच्या शक्तीरूपांचे पूजन करत असताना, मुलींवर होणारे अत्याचार मनाला त्रास देतात. एकीकडे शक्तीरूपाचे पूजन आणि त्याच वेळी हे अत्याचार, हे चित्र संतापजनक आहे. आपण सार्यांनीच या प्रकारांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपल्या पुरुषांची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. विचार बदलले तरच कृती बदलेल, असे त्या म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24