पावसाने झोडपलं आता थंडी गारठवणार! राज्यात मजबूत थंडी पडणार; पाहा हवामान खातं काय म्हणालंय


पावसाने गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पाऊस आता परतीच्या वाटेवर आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस जाणार असल्याच सांगितलं आहे. IMD च्या माहितीनुसार, यावर्षी राज्यात सामान्यापेक्षा 8% अधिक पाऊस पडला आहे. याप्रमाणेच हवामान खात्याने सांगितलं की, यावर्षी थंडी देखील तशीच जोरदार वाजणार आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही वर्तविण्यात आल्याने ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे. 

ऑक्टोबर हीटचा सामना 

राज्याच्या अनेक भागात ‘ऑक्टोबर हीट’चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अगदी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. नागरिक पावसानंतर आता कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. 

वातावरणातील बदलाचं कारण काय? 

गेल्या काही वर्षांपासून वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात सरासरीपेक्षा जास्त थंडी पडण्याची शक्यता आगे. पाऊस देखील सरासरीपेक्षा जास्त कोसळला. प्रशांत महासागरात ‘ला-निना’ प्रणाली सक्रिय झाल्याचा परिणाम 
हवामानावर होत असल्याच हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. 

कडाक्याची थंडी पडण्यामागचं कारण काय? 

ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान ला नीना ऍक्टिव होण्याची दाट शक्यता आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ला नीना अधिक सक्रिय होण्याची शक्यता 71% आहे. तसेच हवामान विभागाच्या मते, थंडी किती प्रमाणात पडेल याचा अंदाज नोव्हेंबर महिन्यात लावता येऊ शकतो. ला नीना याच महिन्यात ऍक्टिव होत असेल तर डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडू शकते. ला नीनामुळे तापमानावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे थंडीतही पाऊस कोसळणार आहे. 

ला नीनाचा प्रभाव किती?

ला निना दरम्यान, पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलतात. त्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग थंड होतो. IMD च्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ला निना सक्रिय होण्याची 71 टक्के शक्यता आहे. IMD महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ला नीना परिस्थिती उद्भवण्याची 71% शक्यता आहे. जेव्हा ला निना येते, तेव्हा उत्तर भारतातील, विशेषतः उत्तर-पश्चिम भारत आणि आसपासच्या मध्य प्रदेशातील तापमान सामान्यपेक्षा कमी होते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24