सायबर पाेलिसांची सतर्कता: बजाज अलायन्स कंपनीस फसवणूक झालेले 2 कोटी परत – Pune News



पुण्यातील येरवडा येथील बजाज अलायन्स कंपनीच्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या काॅर्पोरेट खात्यातून सुमारे १५ काेटी ३० लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर परस्पर हस्तांतरित हाेऊन आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा ऑगस्ट २०२२ मध्ये घडला हाेता. पुणे सायबर पाेलिसांच

.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन सायबर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक मीनल पाटील, पाेलिस उपनिरीक्षक तुषार भाेसले यांच्या पथकाने करुन नऊ आराेपींना अटक केली. असिफ इब्राहीम सय्यद, संभाजी एकनाथ काेलते, अनिल सुभाष काेलते, राकेश बाबुराम गुप्ता, शाम चरण कुमार, मुकेश रामा पाेद्दार, दिनेशकुमार रामअवतार, दिपककुमार पुरुषाेत्तमलाल सराफ, बिमलकांत माेहनलाल सरावगी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आराेपी असिफ सय्यद, संभाजी काेलते व अनिल काेलते यांच्या घर झडतीत पंचनाम्याद्वारे दाेन काेटी ३७ लाख ५० हजार रुपये राेख रक्कम, ११ माेबाईल, नऊ हार्डडिस्क, एक लॅपटाॅप जप्त करण्यात आला आहे.

यासंबंधी आराेपींच्या बँक खात्यातील एकूण सात काेटी ७३ लाख तीन हजार रुपये बँकेत फ्रीझ करण्यात आले हाेते. प्रस्तुत प्रकरणातील आराेपी असिफ सय्यद हा पूर्वी बजाज अलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीत ऑपरेशन विभागात कामास हाेता. त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने संगनमत करुन बजाज अलायन्स कंपनीच्या स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेच्या काॅर्पोरेट खात्यातून परस्पर १५ काेटी ३० लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात परस्पर वळवून सदर रकमेची फसवणूक केली हाेती.

या प्रकरणातील तक्रारदार कंपनी बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स यांनी पुणे न्यायालयात पाेलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल परत मिळावा याकरिता दावा दाखल केला हाेता. त्यानुसार न्यायालयाने पाेलिसांनी पंचनाम्याद्वारे जप्त केलेली रक्कम दाेन काेटी ३० लाख ५० हजार रुपये राेख तातडीने परत करण्यात यावे असे सूचित केले. त्याप्रमाणे सदर कंपनीला हे पैसे पाेलिसांकडून प्रदान करण्यात आलेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24