शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजपतील राजकीय कटुता सध्या एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. असे असताना उद्धव ठाकरे व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येते गुप्त भेट झाल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते तथा
.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला शिवसेना ठाकरे व भाजपमधील राजकीय घटनाक्रमाविषयी एक विश्वासार्ह बातमी मिळाली आहे. त्यानुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांतच 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस स्वतः गाडी चालवत एकटे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांच्यात जवळपास 2 तास बैठक झाली.
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट् रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले. दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत कोण-कोण होते, दिल्लीत त्यांनी कुणाच्या भेटीगाठी घेतल्या हे उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगावे.
आरक्षणवादी मतदारांची फसवणूक टाळण्याचा प्रयत्न
वंचित बहुजन आघाडीला या घटनाक्रमाविषयी जी माहिती मिळाली आहे, ती आम्ही जनतेपुढे ठेवत आहोत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांना भाजप व त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचे पक्के माहिती आहे. याच आरक्षणवादी मतदारांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गत 5 वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता यासंबंधी काही उलटसुलट राजकीय घडामोडी घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही ही माहिती सार्वजनिक पटलावर ठेवत आहोत, असेही वंचित बहुजन आघाडीने यासंबंधी स्पष्ट केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप व शिवसेनेने 2019 ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. पण त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे या दोन्ही पक्षांनी आपली स्वतंत्र चूल मांडली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
पण नंतरच्या काळात शिवसेनेची दोन शकले झाली आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हातात गेली. त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळाले. त्यानंतर यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा दारुण पराभव झाला. तर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उपरोक्त दावा करून राज्याचे राजकारण तापवले आहे.
हे ही वाचा…