​​​​​​​उद्यापासून काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती: ज्येष्ठ नेते जिल्ह्यांत जाऊन घेणार इंटरव्ह्यू, 10 तारखेला पक्षश्रेष्ठींना सादर करणार अहवाल – Mumbai News


विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारपासून (1 ऑक्टोबर) घेतल्या जाणार आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्या

.

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाकडे एकूण 1688 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

या निर्णयानुसार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुणे शहर व पुणे ग्रामीण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे ठाणे जिल्हा, खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे सांगली व सातारा जिल्हा, मुजफ्फर हुसेन यांच्याकडे अहमदनगर आमदार कुणाल पाटील यांच्याकडे नाशिक, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे मुंबई शहर, अमित देशमुख यांच्याकडे सोलापूर व कोल्हापूर, डॉक्टर नितीन राऊत यांच्याकडे वर्धा व यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडे परभणी व हिंगोली, डॉक्टर विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड, प्रा. वसंत पुरके यांच्याकडे अकोला, खासदार नामदेव किरसान यांच्याकडे वाशिम, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्याकडे लातूर व बीड, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडे जालना, आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे मुंबई उपनगर, डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, एम.एम. शेख यांच्याकडे धाराशिव, हुसेन दलवाई यांच्याकडे पालघर, शिवाजीराव मोघे यांच्याकडे धुळे व नंदुरबार, सुरेश शेट्टी यांच्याकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड, आमदार अभिजीत वंजारी यांच्याकडे चंद्रपूर व गडचिरोली, सतीश चतुर्वेदी यांच्याकडे भंडारा व गोंदिया तथा प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्याकडे बुलढाणा व अमरावतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे सर्व नेते दिनांक 1 ते 8 ॲाक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. त्यानंतर 10 ॲाक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

online casino games free