ठाकरे गटाने इस्लामाबादेत दसरा मेळावा घ्यावा: शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा घणाघात; ठाकरेंची नकारात्मक मानसिकता असल्याची टीका – Chhatrapati Sambhajinagar News



लोकसभा निवडणुकीत उबाठाच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकले. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचाही सहभाग होता. त्यामुळे उबाठा गटाने पाकिस्तानातील इस्लमाबादमध्ये यंदाचा दसरा मेळावा घ्यावा, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सो

.

शिवसेना महाविजय संवाद यात्रेत महिला आघाडीने छत्रपती संभाजी नगरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींशी सवांद साधला. महिला आघाडीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद यात्रा राबवली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून महिला आघाडीच्या 19 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला. नवरात्रीपूर्वी महिला आघाडीकडून या अभियानाया पाच दिवसांचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती म्हात्रे यांनी यावेळी दिली.

उबाठा ची मानसिकता नकारात्मक

दसरा मेळाव्यावरुन शीतल म्हात्रे यांनी उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली. लोकसभा निवडणुकीत तुमच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे आणि बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाले होते. पवित्र शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा विचार करणाऱ्या उबाठा गटाची छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याची लायकी नाही. लाडक्या बहिणींना काही देण्याची त्यांची मानसिकता नाही. याऊलट महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, तरुणांसाठी युवा प्रशिक्षण योजना राबवल्या जात आहेत. लोकसभेत विरोधकांनी जे खोटं नरेटिव्ह पसरवले तो प्रयत्न पुन्हा करु नये यादृष्टीने महाविजय संवाद यात्रेत सरकारच्या कामांची जनजागृती केली जाईल, असे म्हात्रे म्हणाल्या.

521 कोटीचा निधी वितरीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 63 लाख 73 हजार महिलांना लाभ मिळाला आहे. यासाठी शासनाकडून 521 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. यातून विरोधकांना एक चपराक मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बोलतात ते करुन दाखवतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असेही शीतल म्हात्रे यावेळी बोलताना म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24