प्रमुख पक्षांचा आरक्षण संपवण्याचा डाव: आंबेडकरांचा भाजप, काँग्रेस, NCP, ठाकरेंवर आरोप; मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यास विरोध – Jalgaon News



आरक्षण कायमचे संपवण्याच्या मुद्यावर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे गट या चारही प्रमुख पक्षांचे मतैक्य असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. प्रमुख पक्ष आरक्षणाविरोधात असले तरी वंचित बहुजन आ

.

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात बोलताना त्यांनी देशातील आरक्षण व्यवस्था संकटात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, देशात आघाड्यांचे राजकारण चालतच राहील. पण आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्यावर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा ठाकरे गट या चारही पक्षांत मतैक्य आहे. वंचित बहुजन आघाडी या षडयंत्राविरोधात लढा देईल. प्रसंगी रस्त्यावरही उतरेल.

विधानसभा निवडणुकीत सामाजिक दृष्टिकोनातून मतांचे ध्रुवीकरण होईल. त्यात आरक्षणाचा लाभ घेणारे एकीकडे व ज्यांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आरक्षण संपवण्याची भूमिका आहे ते दुसऱ्या बाजूला राहतील.

वंचितचा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास विरोध

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची मागणी शासनाने पूर्ण केली नाही. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आता कळीचा बनला आहे. जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतली आहे. पण ओबीसी समाजाने मराठ्यांना आपल्या कोट्यातून आरक्षण देण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. ओबीसींच्या या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, शरद पवार यांनी आपल्या रत्नागिरीच्या सभेत मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. याविषयी त्यांनी त्यांच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादीची भूमिका मांडली. पण ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींचेच रहावे, त्यात इतर कुणाचाही समावेश होता कामा नये ही आमची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी ते वेगळे द्यावे. त्यांचा ओबीसीत समावेश करू नये. आगामी निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावरच लढली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24