ऐनविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा झारखंडमधील एकमेव आमदार फोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार झटका दिला आहे. राष्ट्रवादीचे झारखंडमधील आमदार कमलेश सिंह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांच्या प्रवेशाची तारीखही ठर
.
झारखंडमध्ये महाराष्ट्रासोबतच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. त्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजपने कमलेश सिंह यांच्या रुपात अजित पवारांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून कमलेश सिंह पक्षात आहेत. पण आता पक्षातील बदलत्या राजकारणामुळे त्यांनी आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आगहे. ते आपले पुत्र सूर्य सिंह व आपल्या शेकडो समर्थकांसह येत्या 3 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
कमलेश सिंह राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य
यासंबंधीच्या वृत्तानुसार, कमलेश सिंह हे 1999 मध्ये शरद पवार व तारिक अन्वर यांच्यासह काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी 2005 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2009 पर्यंत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. पण 2009 व 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये ते पुन्हा झारखंड विधानसभेवर पोहोचले.
मध्यतंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षाचा दुसरा गट अस्तित्वात आला. त्यानंतर याच गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ हे पक्षचिन्ह मिळाले. या स्थितीत कमलेश सिंह यांनी अजित पवारांची साथ दिली. तेव्हापासून त्यांची भाजपशी असणारी जवळीक वाढली आणि आता त्यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
झारखंडमध्ये राष्ट्रवादी राओलातही नाही
उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राओलातून बाहेर ठेवले आहे. तिथे त्यांची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व आजसू पक्षासोबत युती आहे. या पक्षांसोबत त्यांचा जागावाटपाचाही फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा दुसरा धक्का असल्याचे मानले जात आहे. कमलेश सिंह हे अजित पवार यांच्या पक्षाचे झारखंडमधील बडे नेते होते. पण आता त्यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राष्ट्रवादीला झारखंडमध्ये नेतृत्वासाठी दुसरा पर्याय शोधावा लागेल.