अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दाली- उद्धव ठाकरे: म्हणाले- हिंमत असेल तर शहांनी मला संपवून दाखवा; CM शिंदेंवरही हल्लाबोल – Nagpur News



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे

.

हिंमत असेल तर संपवून दाखवा- ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी बाजारबुणगे इथे येऊन गेले. ते म्हणतात औरंगजेब संघटनेचे प्रमुख उद्धव ठाकरे. मी औरंगजेब तर तुम्ही कोण? तुम्ही तर अहमद शहा अब्दाली, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. पुढे ते म्हणाले, काय नशीब आहे बघा, अमित शहा जिथे येऊन जातात नंतर तिथे मी येऊन यांना फटकारतो. अमित शहा म्हणतात उद्धव ठाकरेला संपवा. हिंमत असेल तर मैदानात या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवून दाखवा, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

2014 ला भाजपने युती तोडली – ठाकरे

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 25 ते 30 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. तेव्हा शिवसेनेची कधी भाजप झाली नाही, मग आता काय म्हणता शिवसेनेची कॉंग्रेस झाली? मला एकनाथ खडसेंचा फोन आला होता. तेव्हा जागावाटप अंतिम टप्प्यात आले होते. तेव्हा मला फोन करून सांगतात आपल्याला पुढे सोबत नाही जाता येणार, ही युती तोडावी लागेल. वरून तसे आदेश मिळाले आहेत. मी म्हणले ठीक आहे आणि नंतर तुमच्या साक्षीने निवडणूक लढवून जिंकून दाखवले. भाजपचे हे हिंदुत्व नाही, हे थोतांड आहे. आम्हाला दळभद्री गोमूत्रधारी हिंदुत्व मान्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

1500 रुपयांत लाडक्या बहिणीचे काय होते?

उद्धव ठाकरे म्हणाले, मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथल्या एका महिलेला विचारले कसे चालू आहे, त्यावर त्या म्हणाल्या 1500 रुपयात काय होते? 1500 रुपयांत घर पण चालत नाही. मुलांचे शिक्षण 1500 रुपयात होणार आहेत का? असे म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील टीका केली आहे. मोदी-शहांची आम्हाला भीक नको आहे, आम्ही हक्काचे मागत आहोत. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. पण तेव्हा मी अशा सभा घेत सगळ्यांना दाखवत नाही बसलो की मी कर्जमाफी केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांवर लगावला आहे.

मिंधे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या पुतळा कोसळल्याची घटना काही महिन्यापूर्वीच घडली होती. या घटनेनंतर आता चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवलात पुतळ्याच्या निकृष्टतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी या पुतळा दुर्घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केला आहे. ‘मिंधे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला, अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ना उडत, मग महाराजांचा पुतळा पडतो बेशरमपणाने सांगता, वाऱ्याने पडला, असा जोरदार निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला आहे.

एकत्र आल्या नंतर कद्रुपणा करायचा नाही

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकत्र आल्या नंतर कद्रुपणा करायचा नाही. पाठीमागून वार करायचा नाही असे ठरवले आहे. रश्मी बर्वे यांना जात प्रमाणपत्र नाकारले. न्यायालयाने ते अवैध ठरवले. आता अवैध ठरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे ठाकरे म्हणाले. मालवणला वर्ष पूर्ण होण्याच्या आधी छत्रपतींचा पुतळा कोसळला. त्यातही पैसे खाल्ले असे ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झुंजवत ठेवून मुख्य शहरातील मोक्याचे भूखंडाचे श्रीखंड बावनकुळेंसारखे लोक खात आहे. आपले सरकार आल्यावर आपल्या माणसांना नवे भूखंड देऊ, असे ठाकरे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24