पुणे येथील खराडी येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या सभेत बोलताना शरद पवारांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्याचे वैशिष्ट्य काय? कोयता गॅंग. टेल्को, बजाज, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यक
.
शरद पवार म्हणाले, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केले पुण्यामध्ये? मी देशाच्या कामासाठी दिल्लीला जातो, पार्लमेंटचा सभासद आहे म्हणून दिल्लीला जातो. महाराष्ट्राची वर्तमानपत्र मागवून घेतो, टीव्ही लावतो तर काय बघायला मिळते? पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचे वैशिष्ट्य काय तर कोयता गॅंग. आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले? असा प्रश्न उपस्थित केला.
शरद पवार म्हणाले, मला जर कोणी विचारले आजची पिढी काय करते, मला माहीत नाही. कसल्या तरी गोळ्या असतात त्या खाल्ल्या की एकदम चंद्रावर गेल्यासारखे वाटते आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागांमध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोयता गॅंग असो, ड्रग्स व्यवहार असो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळे पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसते आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.
पुढे बोलताना शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली आहे. पवार म्हणाले, मध्यंतरी वाचले एक आमदार अशा कामांमध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतो. आता मी येताना बघितले मोठे मोठे बोर्ड होते. आमचा दमदार आमदार, काय दमदार आहे? चौकशी केली की हा आमदार दमदार आहे म्हणून काय भानगड आहे? नाव काय त्याचे? टिंगरे. अरे बाबा तू सांगतो तू कोणाच्या तिकिटावर निवडून आला, त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्या वेळेला हा पक्ष कोणी काढला? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? संबंध हिंदुस्थानला माहीत असलेल्या या पक्षाच्या वतीने तुला काम करण्याची संधी दिली.
शरद पवार म्हणाले, तू सोडून गेला ठीक आहे, तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता नाही. पण निदान चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. दोन तरुण मुले एका इंपोर्टेड गाडीतून जातात काय आणि समोरून स्कूटीवर दोन तरुण मुलगा मुलगी जात असताना त्यांना उडवले काय, जागच्या जागी त्यांची हात्या काय होते? उद्ध्वस्त होतात आणि अशा वेळेला जखमी झालेल्यांना मदत करायची सोडून हा दिवटा आमदार पोलिस स्टेशनला जातो. यासाठी मत मागितली होती? असा सवाल शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना केला आहे.