धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नका: नरहरी झिरवळ आक्रमक; मंत्रालयालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा – Mumbai News


धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रम

.

सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुर केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांनी कडाडून विरोध केला जात आहे. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. पण त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना एसटीतून आरक्षण दिले, तर आम्हाला काहीच उरणार नाही. त्यानंतरही सरकारने त्यांना अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर सर्वच पक्षांतील 24 आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा या आमदारांकडून देण्यात आला आहे.

नरहरी झिरवाळ यांचा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारने धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. पण हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घेण्याची गरज होती. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावायला हवे होते. सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे ते यासंबंधी म्हणाले होते. आता त्यांनी थेट आंदोलनाचाही इशारा दिला आहे. त्यांचे आंदोलन सोमवारपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नरहरी झिरवाळ यांनी धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच असल्याचा दावाही फेटाळला आहे. धनगर व धनगड जात एकच आहेत. स्पेलिंग चुकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. असे असते तर एवढी वर्षे ही गोष्ट कुणाच्याही लक्षात का आली नाही? विशेषतः यामुळे ही सूची तयार करणाऱ्याला इंग्लिश येत नसावी का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….

निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल:रोहित पवार यांचा विश्वास; सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा सुपडा साफ केला आहे. यातील दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

एक ना धड भाराभर चिंध्या अशी फडणवीसांची अवस्था:तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. या संदर्भात दैनिक सामनामध्ये ठाकरे गटाने म्हटले की, महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. राज्याच्या या नव्या सिंघम साहेबांनी नालासोपारा व कोरेगावच्या बलात्काऱ्यांनाही ‘बदला’पूरचाच न्याय द्यावा. नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील, अशी टीकाही त्यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24