भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात कोसळला: 2 मुली वाहून गेल्या, 13 किरकोळ जखमी; भंडारा जिल्ह्यातील घटना – Nagpur News



भजनाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परतणाऱ्या भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात पडल्यामुळे झालेल्या अपघातात 2 मुली वाहून गेल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घडली आहे. या चिमुकल्यांचा शोध सुरू आहे. या घटनेत 13 जण किरकोळ जखमी झाले असून, त्

.

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खांबा येथील 13 जणांचे भजनी मंडळ ताज मेहंदी बाबाच्या कार्यक्रमासाठी भीवखिडकी येथे गेले होते. 26 रोजी रात्री भजन आटोपल्यानंतर 27 सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी पहाटे हे भजनी मंडळ गावाकडे परतत होते. मंडळात 5 व 7 वर्षीय 2 लहान मुलींसह 13 जणांचा समावेश होता. रस्त्यात पहाटे 5 च्या सुमारास जांभळी वडेगाव मार्गावरील वडेगाव येथे ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट नाल्यात कोसळला. त्यात 2 लहान मुली पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. तर इतर 13 जण किरकोळ जखमी झाले. ते सुखरुप बाहेर पडले.

एनडीआरएफच्या मदतीने मुलींचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि साकोलीच्या पोलिस पथकाने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने टेम्पो नाल्यातून बाहेर काढण्यात आला. सध्या एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून वाहून गेलेल्या 2 मुलींचा शोध घेणे सुरू होते. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. हे वृत्त लिहीपर्यंत मुलींची नावे समजू शकले नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24