नाशिक, पालघर, धुळ्यात आज ऑरेंज अलर्ट: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिजोरदार तर जळगावमध्ये मध्यम पावसाचा अंदाज – Mumbai News


नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज अतिजोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मुंबईत मध्यम, नगर, जळगावमध्ये हलका ते मध्यम

.

दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून हवेच्या कमी दाबाचा द्रोणिय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड ते बांगलादेशपर्यंत पसरला आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी, वर्धा जिल्ह्यात गुरुवारी देखील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील पिण्याचा प्रश्न प्रश्न मिटला आहे. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि इतर परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह 7 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….

अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नाही:तर शिंदेंना मिळालेली मते भाजपची असल्याची संजय राऊत यांची टीका

अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने राज्याच्या तक्तावर तकलादू माणसे बसवले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगजेबाप्रमाणे शहा देखील महाराष्ट्रावर आक्रमण करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्र सगळ्यांचा माज उतरव होतो, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…

महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो!:उद्धव ठाकरे गटाची जहरी टीका; शहांच्या वक्तव्यांवरुन साधला निशाणा

महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24