तालुक्यात सप्टेंबर महिन्यात ८४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले असून बुधवार (दि.२५) सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने शेकडो एकर क्षेत्रावरील मका तूर जमीनदोस्त झाली आहे. उन्हाळ कांद्याची रो
.
तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून काढणीला आलेल्या शेतीपिकांचे नुकसान होत असून पूर्व भागासाठी संजीवनी ठरत असून मुसळधार पावसाची आशा असून विहिरींना पाणी उतरण्यासाठी वाट पाहत आहेत. तीन दिवसांपासून रोज रात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात होते, मात्र गुरुवारी दुपारपासून पाऊस सुरू झाला होता.
बुधवारी रात्री वादळी वारे, विजांचा कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली होती. सकाळपासून वातावरणात दमटपणा असल्याने पावसाची शक्यता होतीच. गुरुवारी सकाळपासून पावसाचे वातावरण झाले होते.
माळवाडी, दोडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
खंबाळे | परिसरात गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. माळवाडी, दोडी, खोपडी, मुसळगाव, गोंदेसह परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे शेतीपिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांतील सगळ्यात मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करावा की शेतीच्या नुकसानीमुळे चिंता व्यक्त करावी अशी द्विधा मन:स्थिती झाली आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता.
दिंडोरी | गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. बुधवारी (दि. २५) दिंडोरी शहरातील बऱ्याच भागांत पावसाने पाणीच पाणी झाले होते तर मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.