अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची सभा पार पडली. या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले. जयंत पाटील भाषणासाठी उभे राहताच अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची मागणी
.
जयंत पाटील म्हणाले, मी इथे फक्त उमेदवाराची घोषणा करण्यासाठी आलो नाही. 1 तारखेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्हाला आघाडी टिकवायची आहे. त्यामुळे आज उमेदवाराची घोषणा करणार नाही, असे जयंत पाटील यांनी ठणकाऊन सांगितले. तसेच भाषण सुरू असताना घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अकोलेचा उमेदवार कोण आहे हे अजूनही कळत नसेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते, असा टोला देखील त्यांनी लगावला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, सध्या श्राद्ध पक्ष सुरू आहे. घट बसल्यावर मुहूर्त आहे उमेदवार घोषणा तेव्हाच होईल. आपण कुठेच उमेदवार घोषित केला नाही. जामनेरमध्ये एक नवीन नेते भाजपमधून आपल्या पक्षात आले. पण त्यांचेही नाव जाहीर केले नाही. मी भाषणात फक्त सांगितले की त्यांच्या हातात तुतारी दिली आहे, कारण अद्याप आपण उमेदवारांची घोषणा करू शकत नाही.