दरोड्याचा बनाव करुन प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची वारजेतील घटना ताजी असतानाच कात्रज परिसरातही अशीच घटना घडली आहे. अनैतिक संबंधातील अडचण दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून त्याचा खून केल्याची घटना २२ सप्टेंबरला रात्री नऊच्या स
.
राणी गोपीनाथ इंगुळकर (वय 32 , रा. दुगड शाळेजवळ, कात्रज) आणि नितिन शंकर ठाकर (वय 45 , रा. कुरण, ता. वेल्हा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोपीनाथ बाळु इंगुळकर (वय 37, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. संभाजी बाळु इंगुळकर (वय 44, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
पटीने स्वतःचा गळा दाबून आत्महत्या केल्याचा बनाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ इंगुळकर हे मार्केटयार्डात हमाली करत होते. त्यांना मणक्याचा त्रास असल्याची माहिती पत्नी राणी हिने दिली होती. २३ सप्टेंबरला गोपीनाथ घरात मृतावस्थेत आढळून आले होते. याबाबत पोलिसांनीन त्यांची पत्नी राणीकडे चौकशी केल्यावर त्यांनी गोपीनाथला मणका दुखीचा त्रास होता. मला जीवंत रहायचे नाही़, माझा गळा दाब असे, ते नेहमी सांगत होते. मला ते स्वतःचा गळा दाबायला लावत होते. त्यांनी स्वत:च गळा दाबून घेऊन आत्महत्या केली, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अकस्मात मयत नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात दाखल केला.
शवविच्छेदन अहवालानुसार गोपीनाथ यांचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. स्वत:चा गळा दाबून कोणाचाही मृत्यु होऊ शकत नाही, असे अहवालात नमूद केले होते. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा राणीकडे चौकशी सुरु केली. तेव्हा तिने प्रियकर नितीन ठकार याच्यासोबत असलेल्या संबंधनाना पती गोपीनाथ अडसर ठरत होता. त्यामुळेच दोघांनी मिळून २२ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास त्याचा गळा दाबून खून केल्याची तिने कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, आणखी तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी दिली.