ही शांत डोक्याने घडवून आणलेली हात्या: अंधेरीत ड्रेनेजमध्ये पडून महिलेचा मृत्यू, वर्षा गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप – Mumbai News



अंधेरी एमआयडीसी परिसरात एका महिलेचा ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेचे नाव विमल आप्पाशा गायकवाड असे आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सिप्झ परिसरातील कंपनीतून घरी जाताना हा अपघात झाला. या घटनेवर खासदार वर

.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्रभर आणि अकार्यक्षम शिंदे सरकारमुळे गुन्हेगारी फोफावून निष्पाप लोक बळी जातच आहेत. पण आणखी एक मृत्यूचा सापळा यांना रचला असून त्यांच्या दुर्लक्षामुळे एका मुंबईकराला आपला जीव गमवावा लागला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 45 वर्षीय विमल गायकवाड या महिलेचा काल रात्री उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. हा अपघात नाही, ही तर शांत डोक्याने घडवून आणलेली हात्या आहे, असा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड यांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षा गायकवाड म्हणाल्या, आमचा थेट प्रश्न आहे की, मॅनहोल उघडे का ठेवण्यात आले होते? त्याठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सूचना फलक का बसवण्यात आला नव्हता? पावसाळ्यापूर्वी मॅकहोल का झाकले गेले नाहीत?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. मान्सूनपूर्व कामे आम्ही कसे करतो आणि मी स्वतः तिथे सहभाग कसा घेतो, हे सारे चमकोगिरी दृश्य दाखवण्यात मुख्यमंत्री महोदयांना फार रस आहे. मुख्यमंत्री महोदय खरेच तुम्ही एवढे कार्यतत्पर आहात का? तसे असले तर मग विमला गायकवाड यांना जीव का गमवावा लागला? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि अन्य संबंधित प्रशासकीय अधिकारी या दुर्घटनेला जबाबदार आहेत. सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. एका मुंबईकराने आपला नाहक जीव गमावला आणि या घटनेला सरकार जबाबदार आहे. कामातील उदासीनता आणि निष्काळजीपणाची हद्दच झाली आता.. पुरे, अशा भावना वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत.

पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुख्यमंत्री महोदय, तुमच्या पोकळ दाव्यांमुळे आता सत्य लपून राहणार नाही. मुंबईकर घडलेल्या घटनांचा हिशोब मागत आहेत, आणि ते आत्ताच मागत आहेत! त्वरित उत्तर द्या, असे आव्हान वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.

कशी घडली घटना? बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सिप्झ परिसरातील कंपनीतून विमल गायकवाड घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी जोरदार पाऊस देखील झाला होता. सिप्झच्या गेट क्रमांक 3 च्या परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. सिप्झ परिसरात अलीकडेच मेट्रो-3 मार्गावरील भुयारी स्थानक उभारण्यात आले आहे. एमएमआरडीएकडून या स्थानकाचे काम करण्यात आले होते. यावेळी येथील रस्त्यावरील एका ड्रेनेज लाईन उघडण्यात आली होती. स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने ड्रेनेज लाईनवर झाकण टाकून ती बंद केली नाही. त्यामुळे विमल गायकवाड चालताना ड्रेनेजमध्ये पडल्या. त्या ड्रेनेजमध्ये पडल्यानंतर वाहत गेल्या.

स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेजमध्ये शोधाशोध केल्यानंतर साधारण 90 मीटर अंतरावर विमल गायकवाड यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या नाकातोंडात बरेच पाणी गेले होते. त्यांना तातडीने कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24