संजय राऊत यांचा जन्मच खोटो बोलण्यासाठी झाला आहे. ते रात्री काहीतरी लिहित बसतात आणि सकाळी बडबड करतात. आपण दिवसभर टीव्हीवर दिसायला पाहिजे म्हणून ते काहीही खोटे बोलत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. संजय राऊत यांना अब्रुनु
.
या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय आता संजय राऊत यांनी स्वीकारला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढचे पाऊल टाकले पाहिजे. आता यापुढे अशा चुका होणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. दिवसभर आपण टीव्हीवर दिसायला हवे, यासाठी रात्री काहीतरी लिहीत बसायचे आणि सकाळी टीव्हीवर येत बडबड करायची. त्यामुळे मध्यमांनी देखील अशा खोटारड्या लोकांना दाखवू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. काही लोकांचा जन्मच खोटे बोलण्यासाठी झाला असल्याची टीका देखील बावनकुळे यांनी केली आहे.
अमित शहा यांनी मोठे उद्दिष्ट दिले
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळे राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. संघटना आणि सरकारच्या विकास कामाच्या माध्यमातून संघटन शक्ती विकसित करण्याचा मूळ मंत्र अमित शहा यांनी दिला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान आहेत. आणि महाराष्ट्रात देखील युतीचे सरकार आले तर येथे देखील मोठे उद्दिष्ट ठेवून अमित शहा यांनी मार्गदर्शन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
बुथ लेव्हलवर काम करण्याच्या सूचना
केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने मागच्या कार्यकाळामध्ये जनतेसाठी जी कामे केली आहेत. ती कामे संघटनेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्यात यावी, असे अमित शहा यांनी सांगितले आहे. विरोधकांनी जनतेला कन्फ्युज केले आहे. ते रोज खोटे बोलत आहेत. ते खोटे बोलून किंवा संवादाने मिटवावे लागेल. लोकांना खरे सांगून जे आपल्यापासून दूर गेले त्यांना पुन्हा आपल्याकडे आणण्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे. त्यासाठी बुथ लेव्हलवरच्या कार्यकर्त्यांवर लक्ष देण्याचे निर्देश अमित शहा यांनी दिले असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला मतदान केले नाही त्यांना पुन्हा आपल्याकडे आणा, त्यासाठी त्यांनी खरे सांगा, असेही शहा यांनी सांगितले.
राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…
संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी:कोर्टाने ठोठावली 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड; मेधा सोमय्यांनी दाखल केला होता दावा

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाब्यात माझगाव न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आजच हा निकाल दिला. या प्रकरणात संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेसह 25 हजारांचा दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…
अजित पवार आता आमदार देखील राहणार नाहीत:उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरुन टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र आता यापुढे ते उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री बनणार नाहीत. कदाचित ते आता आमदार देखील राहणार नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा व्यक्त केली होती. या या बाबतच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…
अजित पवारांचा काँग्रेसला धक्का?:आमदार सुलभा खोडके घड्याळ बांधण्याच्या तयारीत; मतदारसंघात लावले स्वागताचे बॅनर

अमरावती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटात प्रवेश करणार असलयाची चर्चा आता सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या हस्ते अमरावती विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अमरावती मध्ये आलेले अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर आमदार खोडके यांनी लावले आहेत. यामुळे आता याबाबतची चर्चा जास्तच रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा…
काँग्रेसच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे:’अति आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो’; दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत राज्यातील नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…