उद्धव ठाकरे यांची पात्रता केंद्रीय मंत्री उद्धव शहा यांच्यावर टीका करण्याएवढी नाही. ठाकरेंना शहांवर टीका करण्याचा कुठलाच अधिकार उरलेला नाही. त्यांनी स्वतःची पात्रता तपासली तर बरे होईल, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
.
गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. उपमुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी याबाबत कितीही रान पेटवले तरी उपयोग होण्याची शक्यता नाही.
मुख्यमंत्रीपदाबाबत चिंता नाही
गिरीश महाजन म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा देणारा विभाग ठरेल.आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी महायुतीने यापूर्वीच सुरू केली आहे. आमचे सर्व पदाधिकारी अतिशय एक दिलाने काम करीत आहे. कोणालाही मुख्यमंत्री कोण याची चिंता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मविआच्या नेत्यामध्ये सीएमपदावरुन भांडण
गिरीश महाजन म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीआधीच मुख्यमंत्री कोण यावरून भांडण सुरू आहे. या भांडणातच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची काहीही चिंता किंवा आव्हान वाटत नाही, असे महाजन म्हणाले.
उद्धव ठाकरेंची टीका काय?
महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपूर येथे येऊन आम्हाला संपविण्याची भाषा करुन गेले आहेत, मी त्यांचे भाषण काही ऐकलेले नाही. परंतू येथे येऊन उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवार यांना खतम करा असे बाजारबुणगे म्हणाले आहेत. परंतू हा महाराष्ट्र शुरवीरांचा आहे. तुम्ही या तर खरे कोण कोणाला संपवितो ते पाहतो. आम्हाला संपविण्याची भाषा करतात त्यांना योग्य धडा शिकवू असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.