उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र आता यापुढे ते उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री बनणार नाहीत. कदाचित ते आता आमदार देखील राहणार नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा
.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टवर त्यांच्या हातात बंदूक आहे. तुम्ही स्वतःला सिंघम समजतात तर सिंघम स्वतः जाऊन बंदूक घालतो. खाकी वर्दीतील माफियांना सुपारी देऊन गोळ्या घालत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केला. समान कायदा, समान न्याय, याचा विचार केला तर प्रत्येकाला एकच न्याय दिला पाहिजे. काल झालेल्या बलात्कारातील आरोपीला अटक करण्यात आली आहे, मग त्याला देखील अशाच गोळ्या घाला, असे आव्हान देखील त्यांनी दिले आहे.
बदलापूर प्रकरणातील संस्थेमधील दोन-तीन लोकांवर काही आरोपी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आले आहेत. त्यांना वाचवण्यासाठीच तुम्ही एक बळी घेतला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी पुरावा नष्ट केले असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला. या बलात्कार कांडाचा सूत्रधार वेगळाच आहे. त्या शाळेतील मुलींचा वापर करून चाइल्ड पॉर्न फिल्म बनवली जात होती, असा आरोप या याचिकेत करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचे एन्काउंटर करण्यात आले असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
अक्षय शिंदे याचे एन्काउंटर किंवा चकमक वाटत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचे उत्तर देखील तुम्हाला द्यावे लागेल, असा आव्हान देखील त्यांनी दिले. आता मिस्टर शिंदे सिंघम आहेत की फडणवीस सिंघम आहेत, हे त्या दोघांनी ठरवावे. या देशातील कायदा आणि संविधान हा सिंघमने लिहिलेला नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे दोघांनी बसावे अथवा मंत्रिमंडळ बैठकीत सरकारमधील सिंघम कोण? याचा निर्णय घ्यावा, असे आव्हान देखील त्यांनी दिले आहे.
जागावाटपात सर्वांची भूमिका सारखी
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते किंवा इतर सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची शांततापूर्ण आणि संयमाने जागा वाटपाचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका आहे. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय हा समन्वयाने लवकरच होईल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आपण दिल्लीला जात आहोत मात्र या कामासंदर्भात जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…
काँग्रेसच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे:’अति आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो’; दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत राज्यातील नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…
परतीचा पाऊस पुन्हा झोडपणार:संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मान्सून परतीच्या प्रवासाला असताना महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत आणि उपनगरात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई, पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील शाळांना तसेच महाविद्यालयांना शासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…