शिवाजीनगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलाल फेकण्याच्या कारणावरून दगडफेक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली होती. यापैकी एका तरुणाला पोलिसांनी मारहाण केल्याने ब्रेन स्ट्रोक आला. शस्त्रक्रियेदरम्यान तो ब्रेन डेड झाल्याचा आरोप बुधवारी
.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान जय योगेश्वर गणेश मित्रमंडळ व हिंदू स्वराज्य नवयुवक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांत गुलाल टाकण्यावरून वाद झाला. त्या वेळी दगडफेक केली होती. या प्रकरणी शंभूनगर भागातील तरुणांना अटक केली होती. त्यात प्रतीक राजू कुमावत (२१) याचा समावेश होता. त्याला अटकेनंतर न्यायालयात नेले होते. तेथे त्याला चक्कर आली होती. त्यानंतर त्याला घाटीतनेले. त्याला ब्रेन स्ट्रोक आला. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तो ब्रेन डेड झाला.
टाॅर्चर करण्याचा प्रश्नच नाही
अटक करण्यापूर्वी मेडिकल केले. त्याला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे त्याने न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे मानसिक टाॅर्चर करण्याचा प्रश्नच येत नाही. – नवनीत काँवत, पोलिस उपायुक्त
संबंध नसताना अटक केली
प्रतीकचा मिरवणुकीतील भांडणाशी संबंध नव्हता. त्याला १८ सप्टेंबर रोजी पहाटे जबाब घेण्याचे कारण सांगून पोलिस घेऊन गेले होते. त्याला न्यायालयातच चक्कर आली होती, असे त्याचे वडील राजू कुमावत यांनी सांगितले.