राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी हातात पिस्तूल असणाऱ्या बॅनरवरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांचे हे बॅनर फारच धक्कादायक आहे. हे बॅनर पाहणाऱ्या मुलांवर क
.
बदलापूर लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काउंटर केले. या घटनेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनी यावर संशय व्यक्त केला आहे. त्यातच भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे एक वादग्रस्त बॅनर वांद्रे कलानगर परिसरात लावले आहे.
या बॅनरवर फडणवीस यांचे 2 फोटो आहेत. त्यातील एका फोटोत देवेंद्र यांच्या हातात पिस्तुल आहे, तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात रायफल आहे. या बॅनवर ‘बदला पुरा’ असे दोन शब्द लिहिण्यात आलेत. त्यामुळे या बॅनरद्वारे एकप्रकारे अक्षय शिंदेचे एन्काउंटर करुन पोलिसांनी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याचा संदेश दिला आहे.
हे बॅनर माझ्यासाठी फार धक्कादायक
खासदार सुप्रिया सुळे यांनी या बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. जी मुले हे बॅनर पाहतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? आता या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरत आहे.
मिर्झापूरच्या गोष्टी टीव्ही सीरिजमध्येच चालतात. पण बॉस हे वास्तव आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तेथून आम्हाला बंदुका दाखवल्या, तकर आम्ही त्यांना येथून संविधान दाखवू, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाजपला दिला.
हे ही वाचा…
बदलापूरच्या घटनेला एन्काउंटर मानता येणार नाही:4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही, बचावार्थ गोळी डोक्यात नाही पायात मारतात – HC
मुंबई – बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारले की, 4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही हे आम्ही कसे मान्य करावे? आरोपीला हातकडी लावली होती. त्यामुळे स्वसंरक्षणासारखी स्थिती असती तर आरोपीच्या पायावर गोळी चालवता आली असती. वाचा सविस्तर