भाजप हा अजित पवार यांचा वापर करून त्यांना सोडून देणार, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले असून अजित पवारांचा वापर कोणी केला आणि त्यांना कोणी सोडले, हे अजित पवारांना माहीत आहे, अ
.
नीतेश राणे म्हणाले की, भाजपसोबत आल्याने अजित पवारांचे काय वाईट झाले? त्यांचा कोणी वापर केला, त्यांना कोणी सोडले, याबाबत त्यांना माहीत आहे. वापरा आणि फेका ही तुमची सवय आहे. यामध्ये तुझ्या मालकाने पीएचडी केली आहे, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली.
उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही
अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तुझ्या घरकोंबड्या पक्षप्रमुखाला ते जमत नाही म्हणून संजय राऊतला मिर्च्या लागत आहेत. भाजपचा कार्यकर्ता कितीही मोठा झाला, तरी तो प्रथम पक्षाला प्राध्यान्य देतो. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याचे उत्तम उदाहरणे आहेत. हा विषय संजय राऊतला समजण्याच्या पलिकडचा आहे. कारण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या शिवसैनिकांना वेळ दिला नाही, त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे तुला आणि तुझ्या घरकोंबड्या मालकाला भाजप कार्यकर्ते कळणार नाहीत, असेही नीतेश राणे म्हणाले.
अक्षय शिंदे एन्काउंटरवर मविआवर टीका
भाजप आमदार नीतेश राणे यांनी महाविकास आघाडीने बलात्कार लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरवर उपस्थित केलेले प्रश्नांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला, त्यात पोलिसांचा जीव जावा अशी तुमची इच्छा होती का? असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. अक्षय शिंदे हा कोणी महात्मा नव्हता. आधी त्याचे चरित्र बघा, मग त्याची बाजू घ्या. अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली आहे.