शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून महिलांना प्रलोभन देण्यासाठी पैशांचे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाकरे गट हिंगोली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वा
.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे मतदारसंघातील महिलांना पैसे वाटप करणार, अशी दवंडी देणारा एक व्हिडिओ समोर आला. यानंतर ठाकरे गट हिंगोली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकोटे यांची भेट घेऊन याप्राकरणी एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे मतदारसंघात महिल मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे वाटत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांतून आलेला काळा पैसा अशाप्रकारे वाटप वाटप केला जात आहे. त्यामुळे या पैसे वाटपाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना ठाकरे गट हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अजय पाटील, माजी आमदार संतोष टारफे, बालासाहेब मगर, रमेश मस्के, अजित मगर, आनंदराव जगताप, उद्धव गायकवाड, सखाराम उबाळे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधकांना पराभवाची भिती
कळमनुरी मतदारसंघात झालेली विकास, तसेच शासनाच्या लाडकी बहीण योजनेसह विविध लोकउपायोगी योजना आणि मतदारसंघात शिंदे गटासाठी पोषक वातावरण होत असल्यामुळे विरोधकांना पराभवाची भिती वाटत आहे, त्यामुळे असे आरोप होत असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले.