धोका कुणी कुणाला दिला हे महाराष्ट्र जानतो. अमित शहा यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना धोका दिला. यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरेंनी धोका दिला नसून स्वत: अमित शहांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला धोका द
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, दिवगंत बाळासाहेब ठाकरेंच्या रुममध्ये जी चर्चा झाली, जो शब्द दिला गेला त्यासंदर्भातील धोकेबाजी कुणी केली असेल तर ती याच अमित शहांनी केली असे म्हणत राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सीएम स्वाभिमान शून्य
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री लाचार, लोचट आणि स्वाभिमान शुन्य आहेत. ते अमित शहा यांचे सुपूत्र आले तरी स्वागताला येतील. एकनाथ शिंदे हे उपकारकर्त्यांच्या स्वागताला ते हजर राहणारच, शहांनी खोटे नाटे उद्योग करुन त्यांना हे पद मिळवून दिले आहे. मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चोटोगिरी करतात हे दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिंदेंना काय काम आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
महाराष्ट्रामध्ये भाजपची खटीया खडी होतेय
संजय राऊत म्हणाले की, संजय राऊत म्हणाले की, मणिपूर, कश्मीरच्या सीमेवर, लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं आहे, त्याचा आढावा नाही. अरुणाचलमध्ये 60 किलोमीटर अंतरापर्यंत चीनचं सैन्य घुसलं आहे, त्याचा आढावा नाही. अनेक राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहे, पण त्याचाही आढावा नाही. पण आपल्या राज्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला अमित शहा गृहमंत्रालयाचे विशेष विमान घेऊन येत आहेत, ही गोष्ट मला फार गंमतीची वाटते आहे. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भाजपची खटीया खडी होते आहे,
कामं सोडून विधानसभेसाठी आढावा
संजय राऊत म्हणाले की, अमित शहा आज नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांच्याकडून जागांचा आढावा घेतला जात आहे. यावर ते म्हणाले की, देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व कामं टाकून मणिपूर, उत्तर प्रदेश, लडाख घुसखोरी, देशाची कायदा-सुव्यवस्था, अतिरेक्यांचे प्रश्न असतील, हे सर्व वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात. ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे,
दबाव टाकण्यासाठी गृहमंत्र्यांचा दौरा
गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येणार आणि त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दम देणार की निवडणुकीत मतमोजणी करताना आमच्या बाजूने रहा असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांच्या पलीकडे ते काही आढावा घेत नाही. गृहमंत्री येतात म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी ते येतात.हा गेल्या 10 वर्षांतील अनुभव आहे, लोकसभा निवडणुकीत असे झाले आहे.
मोदी-शहा आले की प्रकल्प जातात
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा राज्यातील प्रकल्प हा बाहेर जातो, आता नाशिकमधील कोणता उद्योग बाहेर जाईल या प्रकरणी नागरिकांनी अलर्ट राहिले पाहिजे, अशी चिंता आम्हाला लागून राहिली आहे.