मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यांना दिलेला शब्द राज्य सरकारने मोडला, त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्य
.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित व्हावे, यासाठी सरकारने स्वतः गंभीर पावले टाकली पाहिजे. त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला करून सरकारने आशादायक चित्र निर्माण केले पाहिजे, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी या आधी देखील आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मुंबई येथे बैठक झाली होती. या बैठकीनंतर राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मराठा समाजाचा प्रश्न मिटला, असा समज निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारने दिलेल्या शब्द मोडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवून त्यांचा जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. आम्ही सर्व पद्धतीने त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे देखील चव्हाण म्हणाले.
वैद्यकीय उपचार घेऊन उपोषण तात्काळ स्थगित करावे
मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. मात्र तो मनोज जरांगे पाटील यांच्या जीवापेक्षा मोठा नाही. हा प्रश्न आज ना उद्या नक्की सुटेल. कदाचित नवे सरकार आल्यावर हा प्रश्न सोडला जाईल. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आधी वैद्यकीय उपचार घेऊन उपोषण तात्काळ स्थगित करावे, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा….
मनोज जरांगे यांच्यावर रात्री सलाईन लाऊन उपचार सुरु:उपोषणाचा आज 9 वा दिवस; दुसरीकडे ओबीसी समाजाचे आंदोलनही सुरुच

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. काल रात्री त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. अखेर मराठा समाजाच्या आग्रहामुळे रात्री सव्वा बारा वाजता त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पूर्ण बातमी वाचा…