भाजप तीन नेत्यांच्या नेतृत्वात लढणार विधानसभा: नागपूर येथील भाजपच्या आढावा बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरली – Nagpur News



नागपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत कार्यकर्त्यांना पत्रके वाटण्यात आली. या पत्रकांमध्ये अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आगामी विधानसभा न

.

या पत्रकात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकत नाही तोपर्यंत कोणीही थकणार नाही, विश्रांती घेणार नाही. आता सर्वांचे एकच लक्ष्य आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, असे म्हणले आहे. काही लोक चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपल्याला हा चक्रव्यूह भेदायचा आहे असा कानमंत्र ही कार्यकर्त्यांना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्याच सोबत कार्यकर्त्यांना काही सूचना तसेच निवडणुकी संदर्भात नियोजन पद्धती मांडण्यात आली आहे.

तरुण व महिला मतदारांकडे भाजपचे विशेष लक्ष आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोअर कमिटी बैठकीत युवा मोर्चा व महिला मोर्चांवर विशेष जबाबदारी असणार आहे. तरुण व महिलांची मतदार नोंदणी मोठ्या संख्येने करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचसोबत लाडकी बहीण आणि लाडका भाऊ लाभार्थी वाढवण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपने तरुण व महिलांकडे विशेष लक्ष देण्याची रणनीती आखली असल्याचे स्पष्ट होत आहे.

आढावा बैठकीत नितीन गडकरी अनुपस्थित दरम्यान, नागपुरात झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आलेले असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र उपस्थित नसणार आहेत. नितीन गडकरी हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मीर येथील निवडणूक प्रचाराचा त्यांचा हा नियोजित दौरा आहे. त्यामुळे नागपूर येथील आढावा बैठकीला स्थानिक भाजप खासदार भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असले तरी नितीन गडकरी उपस्थित नसणार आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांना डावलले तर जात नाहीये? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24