आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नागपूर येथे विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेत आहेत. मात्र, त्यांच्या या आढावा बैठकीला केंद्री
.
यासंदर्भात भाजपच्या वतीने देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नितीन गडकरी हे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्यावर जात आहेत. नितीन गडकरी यांचा जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचाराचा नियोजित दौरा आहे. त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीलाच विदर्भातील महत्त्वाचा नेता उपस्थित नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
जागा वाटपाबरोबरच उमेदवारांच्या निवडीबाबत देखील निर्णय
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सावध भूमिका घेत आहे. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा देखील तातडीने आणि लवकर करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. त्यातच त्याआधीच भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबरोबरच उमेदवारांच्या निवडीबाबत देखील काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
1500 पदाधिकारी उपस्थित राहणार
विदर्भात आयोजित या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 1500 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये अमित शहा विदर्भातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. सुरेश भट सभागृह ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच सुरेश भट सभागृहाच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत आहे.
राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांची थातूरमातूर उत्तरे:घटनाक्रम सांगण्यासही नकार, पाच मिनिटात गुंडाळली पत्रकार परिषद

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचे एनकाउंटर काल झाले. यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मात्र, असे असताना ठाणे पोलिसांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. इतकेच नाही तर पोलिसांनी पूर्ण घटना सांगण्यासही नकार दिला. अवघ्या पाच मिनिटात ही पत्रकार परिषद गुंडाळली. पूर्ण बातमी वाचा…
शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा:ते निवडणुकीनंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न करतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच आहेत, हे आता स्पष्ट झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार प्रयत्न करणार असल्याचा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…