महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. अखेर महायुतीची भानगड पुढे आली असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर सोबत भाजप आमदारांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, भाजपच्या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटे बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, असा व्हिडिओ X वर पोस्ट केला आहे.