“ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  



मागच्या काही काळापासून आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे भाजपा खासदार भाजपा खासदार नितेश राणे हे सातत्याने मुस्लिम समाजाविरोधात विधानं करत आहेत. दरम्यान, माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ओवेसी यांच्या पायजम्याची साइज ही टिंगूच्या पायजम्याच्या साइजपेक्षा मोठी आहे, अशी टीका जलील यांनी केली आहे. 

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी करत सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली काढली होती. या आंदोलनाचं नेतृत्व करताना इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांवर प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप केला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले की, पोलिसांनी आमच्या मोर्चाला मुलुंडजवळ रोखले. त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही. सर्व कायदे केवळ आमच्याविरोधातच लागू केले जाणार का? हे लोक जाणीवपूर्वक आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात फुटीरतावादी समाज तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 

Web Title: “Owaisi’s pajama size is bigger than Tingu’s”, Imtiaz Jalil criticizes Nitesh Rane  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24