बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याने पोलिसांकडून बंदूक घेऊन स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. अक्
.
आरोपी अक्षय शिंदेसोबतच पोलिस अधिकाऱ्यालाही गोळी लागली आहे. या पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अक्षय शिंदे हा आरोपी पळून जात असल्याची शंकाही वर्तवली जात आहे. अक्षय शिंदेचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्याला सध्या रुग्णालयात दाखल केले असून त्याचा मृत्यू झाला असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, सध्या याबाबतीत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिस ठाण्याकडे नेत असतांना अक्षयने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत अक्षय शिंदे यालाही गोळी लागली आहे.
चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे कोण?

बदलापूर; आरोपीने 3 लग्न केले, तिन्ही बायकांनी सोडले:तिसऱ्या पत्नीची महिन्याभरातच सोडचिठ्ठी, मोबाइलमध्ये आढळले अश्लील व्हिडिओ
‘त्याला चौकाचौकात फाशी द्यावी. शिक्षा अशी असावी की त्याच्यासारख्या लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल. आमच्या गावाचे नाव खराब केले. आता त्याच्या कुटुंबीयांनाही येथे राहू दिले जाणार नाही. त्याने केलेल्या कृत्याची संपूर्ण गावालाच लाज वाटते.
बदलापूरच्या खरवई गावातील लोक संतप्त झाले आहेत. हे गाव महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आहे. हे प्रकरण शाळेतील दोन 4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचे असून आरोपी अक्षय शिंदे हा याच गावचा रहिवासी आहे. हा सर्व प्रकार 13 ऑगस्ट रोजी घडला. अक्षय आणि त्याचे कुटुंबीय शाळेत साफसफाईचे काम करायचे. वाचा संपूर्ण बातमी…
बलात्कार हत्या प्रकरणाची टाइमलाइन…

ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत…