महाराष्ट्रातील लोकांना कुत्र्याचे मटण खावे लागेल: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान, धनगर आरक्षणावर आक्रमक – Kolhapur News



धनगर समाजाने शेळ्यामेंढ्या राखणे बंद केले तर महाराष्ट्रातील लोकांवर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येईल, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

.

धनगर समाजाने अनुसूचित जमातीतून (एसटी) आरक्षणाची मागणी केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात या समाजाने सोममवारी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बोलताना पडळकर यांनी उपरोक्त विधान केले. पडळकर म्हणाले, धनगर समाज 8-10 महिने शेळ्या-मेंढ्या घेऊन घराबाहेर राहतो. महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या दर्जाचे मांस मिळावे म्हणून दिवसाला 35 किलोमीटरची पायपीट करतो. पण एखाद्याच्या रानात चुकून मेंढरे गेली तर मेंढपाळाला गुराढोरासारखे मारले जाते. पोलिसही त्याची दखल घेत नाही. हा अन्याय आम्ही का सहन करायचा? धनगरांनी शेळ्या-मेंढ्या पाळणे बंद करेले तर महाराष्ट्रातील जनतेवर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येईल.

आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे ही आमची पहिली मागणी आहे. आमची मुले शिकली तर त्यांच्यावर मेंढरे पाळायची वेळ येणार नाही. धनगर नेहमीच सरकारच्या बाजूने उभा राहिला. पण आम्हाला अद्याप काहीच मिळाले नाही. त्यामुळे सरकारने धनगर समाजाला तत्काळ एसटी आरक्षण देण्याचा जीआर काढावा. धनगर समाजाकडे कोणतेही कारखाने नाहीत. त्यामुळे आम्ही आरक्षणाची मागणी करत आहोत. एक-दोन नेत्यांच्या सुतगिरण्या सोडल्या तर आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा, असे आव्हानही पडळकर यांनी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विचारला.

राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको

उल्लेखनीय बाब म्हणजे धनगर समाजाकडून आज आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. नेवासा तालुक्यातील धनगर आंदोलकांनी नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यात शेकडो समाजबांधवांनी सहभाग घेतला. यावेळी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.

धनगर समाजाला आरक्षण दिले तर राजीनामा

दुसरीकडे, धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिले तर जवळपास 60 ते 65 आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांनी सरकारला दिला आहे. राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा निर्णय घेत आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. त्यानंतरही सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी जीआर काढण्याचा प्रयत्न केला, तर आमचे 65 आमदार विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असे ते म्हणाले.

धनगर आरक्षणावर सरकार सकारात्मक

दरम्यान, धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करुन आरक्षणाचा लाभ देण्याबाबत स्थापन केलेल्या सुधाकर शिंदे समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच सकल धनगर समाजाच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत सरकार गंभीर असून सकारात्मक प्रयत्न करत आहे, असे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी स्पष्ट केले.

हे ही वाचा…

अजित पवारांच्या EXIT साठी सेना- BJP चे चक्रव्यूह?:वादग्रस्त विधाने करण्याची आक्रमक रणनीती, महायुतीत रंगला अंतर्गत कलगीतुरा

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतून बाहेर पडावा यासाठी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार वेगळे झाले तर भाजप व शिवसेनेला अधिकाधिक जागा लढवता येतील असा या दोन्ही पक्षांचा डाव आहे, असा दावा एका मराठी वृत्तपत्राने केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24