मी महाराष्ट्रात असताना महाराष्ट्रीयन आणि मुस्लिमांना एक रुपयाचाही बिझनेस देणार नाही, अशी मुजोर भाषा वापरणाऱ्या एका उत्तर भारतीय टीसीला रेल्वे प्रशासनाने निलंबीत केले आहे. आशिष पांडे असे या पश्चिम रेल्वेच्या टीसीचे नाव आहे. एका माणसाशी फोनवर बोलताना म
.
या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे. पांडे याच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धार्मिक समुदाय आणि महाराष्ट्रीयन यांच्याबद्दल मुजोरीची भाषा वापरणाऱ्या टीसीला निलंबित करण्यात आले, असे मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.
नेमका काय म्हणाला आशिष पांडे? आशिष पांडे हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून सध्या मुंबईतील विक्रोळी येथे राहतो. तो समोरच्या व्यक्तीला म्हणाला की, मी विक्रोळी येथे टागोर नगरमध्ये राहतो. मी मोठा झाल्यापासून मुसलमान आणि महाराष्ट्रीयन लोकांना बिझनेस देतच नाही. तसेच मी महाराष्ट्रीयन आणि मुसलमान रिक्षावाल्यांच्या रिक्षात बसत नाही. मी फक्त युपीवाला रिक्षावाला असेल तरच रिक्षात बसतो.
मी जेव्हा तुमचा मोबाईल नंबर ट्रू कॉलरवर सर्च केला तेव्हा तुम्ही महाराष्ट्रीय असल्याचे मला समजले. त्यामुळे मला तुमच्यासोबत व्यवसाय करायचा नाही. मला या माणसाला प्रॉफीट द्यायचा नाही, असे मी ठरवले. मी 9 वाजता कामाला जातो आणि 10 वाजेपर्यंत 5000 हजार रूपये कमावले असेल. मला पैशांचा गर्व नाही. पण महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रीयन आणि मुस्लिमांना एक रूपयाचाही बिझनेस देणार नाही, असे मी ठरवले आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. असे म्हणून आशिष पांडे याने फोन ठेवून दिला.
मनसेने शिकवला धडा
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तातडीने याची दखल घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आशिष पांडे याला गाठले आणि चांगलाच चोप देत धडा शिकवला असून कठोर इशारा देखील दिला.