मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबर रोजी होणारी सिनेट निवडणूक महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली होती. याच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली असून राज्य सरकारला न्याया
.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत याचिकाकर्ते आणि विद्यापीठ यांच्यात युक्तिवाद झाला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी पार पडली व त्यानंतर निवडणूक उद्याच घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेला दिलासा मिळाला आहे.
या आदेशानंतर ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे आम्ही आभारी मानू इच्छितो. कारण वेळीच त्यांनी सुनावणी घेऊन उद्याच्या उद्या निवडणूक घेण्याविषयी निर्देश दिले. हा विजय केवळ युवा सेनेचा नसून 13 हजार 500 पदवीधरांचा विजय आहे. या सरकारने जे पदवीधरांच्या बाबतीत षड्यंत्र रचले होते ते न्यायालयाने हाणून पाडले आहे.
युवा सेना मुंबई सिनेट निवडणुकीचे उमेदवार आणि याचिकाकर्ते प्रदीप सावंत म्हणाले, हा लोकशाहीचा विजय आहे. आम्ही पूर्णपणे निवडणुकीला उद्या सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना सुद्धा आमची शिवसेनेची फौज तयार आहे. गेल्या वेळेस सारखे आम्ही दहाच्या दहा जागांवर विजय मिळवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रडीचा डाव विद्यापीठ आणि राज्य सरकारने खेळला पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कोर्टाने निर्देश दिले आहेत, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
घाबरट व गद्दार मुख्यमंत्री दरम्यान, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक रद्द करण्यात आल्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. एवढे घाबरट व गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने याआधी कधीही पहिले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केली होती.