ठाणे : घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने मेट्रोच्या खांबाला धडक दिली. या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सोमवारी रात्री घोबंदर रोडवरील ओवळा सिग्नलजवळ हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. लाल बस एसटी बसने पिलरला धडक दिल्याने बसच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. 

या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेदांत, रामानंद आणि टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एमएसआरटीसीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाचे अधिकारी बस काढण्यासाठी मंगळवारी सकाळी पोहोचले. घोडबंदर रोडवरील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.


हेही वाचा

पश्चिम रेल्वेवरील गर्दी होणार कमी! रेल्वेचा मोठा निर्णय


गणेशोत्सवात कोकण मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24