पनवेल-मडगाव दरम्यान दोन अतिरिक्त विशेष रेल्वे धावणार

रेल्वेने गणेशोत्सव दरम्यान होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मडगाव-पनवेल-मडगाव विशेष (2 सेवा) 01428 ही विशेष गाडी 15 सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल. पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 22.15 वाजता पोहोचेल. तर 01427 ही विशेष गाडी 15 सप्टेंबर रोजी पनवेल येथून मध्यरात्री 23.45 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल.

या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी असे थांबे असतील.

रेल्वे गाडीला 1 द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 2 तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, आठ शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी (१ गार्ड ब्रेक व्हॅनसह) आणि एक जनरेटर कार असे डबे असतील.

रेल्वे आरक्षणासाठी विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर 10 सप्टेंबर रोजी सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा

मुंबई : माउंट मेरी फेअरसाठी बेस्टच्या जादा बसेस धावणार


‘ST’चा विक्रम! 2.5 लाख मुंबईकरांचा ‘एसटी’नं प्रवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24