मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट होणार

मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांचा रेल्वे प्रवास अधिक वेगात व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडण्यासाठी आणि लोणावळा घाटातील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवे मार्ग तयार करण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.

लोणवळा-खंडाळा घाट वगळणार

नव्या मार्गामुळे मेल आणि एक्स्प्रेस लोणावळा घाटातून न जाता थेट पुण्याला पोहचू शकणार आहेत. महत्वाचे म्हणजे या नव्या मार्गामुळे रेल्वेचा वेग देखील वाढणार आहे. त्याचसोबत मध्य रेल्वेला मुंबई-पुणे या मार्गावर जास्त रेल्वे गाड्या चालवणे शक्य होणार आहे.

मुंबई-पुणे नव्या रेल्वे मार्गामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये देखील बचत होणार आहे. या रेल्वे प्रवासाच्या वेळेत एक तासाची बचत होणार आहे. म्हणजे जर मुंबईवरून पुण्याला पोहचायला तुम्हाला ३ तास लागत असतील तर नव्या मार्गामुळे फक्त दोन तासांत पुण्यामध्ये पोहचता येणार आहे.

रेल्वे-एक्स्प्रेसचा वेग वाढणार

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गातून प्रवास करताना लोणावळा-खंडाळा घाट लागतो. हा घाट ओलांडूनच मुंबई किंवा पुण्यामध्ये आपण पोहचतो. प्रवासी सुरक्षिततेमुळे या घाटातून प्रवास करताना मेल-एक्स्प्रेसला 60 कि.मी अशी वेगमर्यादा आहे.

लोणावळा- खंडाळा घाटात जाण्यापूर्वी किंवा घाट उतरल्यानंतर कर्जत रेल्वे स्थानकावर मेल-एक्स्प्रेसला बँकर म्हणजेच अतिरिक्त इंजिन जोडले जाते. बँकर जोडण्यासाठी 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवासी वेळ वाढतो. याच प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नवीन मार्गासाठी चाचपणी सुरू केली आहे.

नवा मार्ग सुरू झाला तर या मार्गावरून रेल्वे आणि एक्स्प्रेस ताशी 110 कि.मी वेगावे धावू शकणार आहेत.

नव्या मार्गाचा काय फायदा होणार?

नव्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गामुळे प्रवासाची वेळ कमी होणार आहे. मुंबई ते पुणे या घाटातील चढ-उतार, वळणे कमी होतील म्हणजेच गाडी सुसाट जाईल. मेल आणि एक्स्प्रेसचा वेग वाढेल. त्याचसोबत मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल.


हेही वाचा

गणेशोत्सवात मेट्रो रात्री उशीरापर्यंत धावणार, पाहा टाईमटेबल


नवी मुंबई : आनंदाची बातमी! सिडकोकडून मेट्रोच्या दरात घट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ng slots