पुण्याच्या रस्त्यावर थरार! दारुच्या नशेत टेम्पो चालकाची धडक, मनसेचे नते गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू

Pune Accident: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना पुण्यातून वारंवार समोर येत आहेत. पोर्शे कार अपघातानंतर कल्याणी नगर परिसराची देशभरात चर्चा झाली. आता असाच एक प्रकार पुण्यातून समोर आलाय. दारुच्या नशेत टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय.

रात्री अकराच्या सुमारास पौड फाटा इथं हा अपघात झालाय.आशिष पवार हा टेम्पो चालक दारू पिऊन टेम्पो चालवत होता.कोथरूडमधील करिश्मा चौकात त्याने पादचाऱ्यांना धडक दिली होती. यात काही पादचारी जखमी झाले होते.

टेम्पो गेला अंगावरुन

त्यानंतर तो त्याच वेगात आणि नशेत पुढे टेम्पो चालवत आला. अमराळे दाम्पत्य सिग्नलला थांबलं होतं. मद्यधुंद चालकाने अमराळे दाम्पत्याला धडक दिली. ज्यात गितांजली अमराळे यांच्या अंगावरून टेम्पो गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर तिथं असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पुण्यात बायकोनेच केला नवऱ्याचा खून

दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याचा बायकोने खून केल्याचा प्रकार समोर आलाय. तिने स्वयंपाक घरातील चाकू घेऊन नवऱ्याच्या छातीत खुपसला.रक्तस्त्राव झाल्याने नवऱ्याचा मृत्यू..
किरपा बिप्त असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे पुण्यातील नरे परिसरात सायंकाळी ही घटना घडली.आरोपी पत्नी हिरा बिप्त हिला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास सिहगड रोड पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

rich queen