पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल: 19 डिसेंबरला देशात राजकीय भूकंप, अमेरिकेचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा – Maharashtra News



“येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. अमेरिकेतील एका इस्त्रायली गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची माहिती बाहेर येणार असून, त्यामुळे अनेक बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. या वादळात कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून त्या जा

.

पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो’, अशा आशयाचे ट्वीट केले होते. हे ट्वीट तूफान व्हायरल झाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज त्यांच्या ट्वीटचा सविस्तर खुलासा केला.

नेमके काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “”जगात बरेच काही चालले आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केले होते. ते ट्वीट खूप व्हायरल झाले होते. मी म्हटले होते की, कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले. याचा अर्थ काय आहे. कोण म्हटले तुम्ही होणार आहात का? तर कुणाला याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता मराठी माणूस होणार म्हणजे, आता बसलेल्या माणसाला बाजूला व्हावे लागेल, मी आधीच अधोरेखीत केले आहे, नाव न घेता. बहुतेक बदल घडण्याची शक्यता आहे. बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. सत्तेत असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी होईल आणि तो कदाचित ‘मराठी माणूस’ असू शकतो. 19 डिसेंबरला हे घडेल, असा माझा अंदाज आहे.”

19 डिसेंबर आणि ‘इस्त्रायली गुप्तहेरा’चे कनेक्शन

या राजकीय भूकंपामागे आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, “अमेरिकेत एक ‘अ‍ॅमस्टिन’ नावाचा माणूस होता, जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने मोठमोठ्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून लोकांचे खाजगी क्षण टिपले आहेत. अमेरिकन संसदेने कायदा केला असून, त्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही आहे. त्यानुसार 19 डिसेंबरला या प्रकरणातील 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल्सचा डेटा जाहीर होणार आहे. हा डेटा सर्च करता येणार असून, यात कितीही मोठा माणूस असला तरी त्याला संरक्षण मिळणार नाही, असे अमेरिकन संसदेने स्पष्ट केले आहे.”

नावे समोर येणार?

“या माहितीत नेमकं कोणाकोणाचं नाव आहे आणि त्यांनी काय पराक्रम केले आहेत, हे 19 डिसेंबरला जगासमोर येईल. सोशल मीडियावर काही नावे चर्चिली जात आहेत. त्यामुळे मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आशा आहे, काही तरी होईल, हे ठरवून आम्ही पुढे चाललो आहे,” असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे 19 डिसेंबरला नक्की काय माहिती बाहेर येणार आणि त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *