आरटीओमध्ये बदलीसाठी प्रत्येकी 50 लाखांची मागणी: 245 तक्रारी जाऊनही अतिरिक्त आयुक्तावर कारवाई का नाही? अनिल परबांचा सवाल – Nagpur News



शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप करत सभागृहात खळबळ उडवून दिली. “माझ्याकडे ‘ब्रह्मास्त्र’ आहे, मला कोणीही रोखू शकत नाही,” अशी दर्पोक्ती करणाऱ्या या अधिकाऱ्याने बदल्यांसाठी तब्बल 33

.

अनिल परब यांनी कळसकर यांच्या भ्रष्टाचाराची कुंडलीच सभागृहात मांडली. ते म्हणाले, “भरत कळसकर यांनी 331 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची मागणी केली. ‘पहिले 10 लाख द्या, मग पोस्टिंग करतो’, अशी त्यांची पद्धत आहे. या जाचाला कंटाळून विभागातील 245 अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री कार्यालयाकडे (CMO) तक्रारी केल्या आहेत. कदाचित मंत्र्यांना याची कल्पना नसेल, पण इतक्या मोठ्या संख्येने तक्रारी जाऊनही कारवाई का होत नाही?” असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.

आमदार-खासदारांची पत्रे कचऱ्यात टाकतो

भरत कळसकर यांच्या अरेरावीचा किस्सा सांगताना परब म्हणाले की, हा अधिकारी स्वतःला कुणीच रोखू शकत नाही, अशा थाटात वावरतो. “माझ्याकडे आमदार आणि खासदारांची पत्रे येतात, ती मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. माझे आता केवळ ७ महिने राहिले आहेत. मी कामात ‘अतिरेकी’ आहे, मला कोणी रोखू शकत नाही,” असे हा अधिकारी उघडपणे बोलतो. त्याने आतापर्यंत ६०० बदल्या केल्याचा आणि बोगस लायसन्स वाटल्याचा दावाही अनिल परब यांनी केला.

भरत कळसकरकडे नेमके ‘ब्रह्मास्त्र’ कोणाचे?

भरत कळसकर आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना धमकावताना ‘माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे’ असे सांगतात, यावर परब यांनी बोट ठेवले. “मी तक्रारींना भीत नाही, मला जे करायचे आहे तेच मी करणार. माझ्याकउे ब्रह्मास्त्र आहे,” असे हा अधिकारी म्हणतो. मग हे ब्रह्मास्त्र नेमके कोण आहे? कोणाच्या जीवावर हा अधिकारी एवढा माजला आहे? याचे नाव सरकारने समोर आणावे, अशी मागणी अनिल परब यांनी लावून धरली.

शेल कंपन्या आणि काळा पैसा

अनिल परब यांनी भरत कळसकरवर केवळ लाचखोरीच नाही, तर मनी लाँड्रिंगचा आरोपही केला. “या अधिकाऱ्याने मेसर्स आणि इतर नावाने बोगस ‘शेल कंपन्या’ स्थापन केल्या आहेत. फक्त रजिस्टर असलेल्या या 3 कंपन्यांमध्ये कोणताही व्यवहार झालेला नसताना पैसे कुठून आले? भ्रष्टाचाराचा काळा पैसा या कंपन्यांमध्ये गुंतवून तो पांढरा केला जात आहे,” असा दावा अनिल परब यांनी केला.

मंत्र्यांनी वाचवल्यास आशीर्वाद समजणार

“मागील अडीच वर्षांत तुमच्या कृपेने मला ईडी आणि इन्कम टॅक्सचा चांगला अभ्यास करायला मिळाला आहे, त्यामुळे हे घोटाळे मला पटकन समजतात,” असा टोला लगावत अनिल परब यांनी सरकारला इशारा दिला. “एवढे पुरावे देऊनही जर मंत्र्यांनी या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्व त्यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे, असे आम्हाला नाईलाजाने म्हणावे लागेल,” असे अनिल परब यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *