![]()
निवडणुकीत प्रत्येक बुथवरील अधिकारीच सत्ताधारी पक्षाला 100 ते 150 मते टाकत असल्याचा गंभीर आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. सद्यस्थितीत मतांची चोरी होत नसू, सत्ताधारी पक्षाला अधिकची मते देण्याची परिस्थ
.
देशात व महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने कथित मतचोरीच्या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळ करून भाजप निवडणुका जिंकत असल्याचा आरोप या प्रकरणी केला जात आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांनी याहून वेगळा दावा केला आहे. त्यांच्या मते, निवडणुकीत ज्याला मताचा अधिकार बजावता आला नाही, तो हे म्हणून शकतो की, निवडणूक आयोगाने माझे मतं चोरले आहे. मताचा अधिकार वापरायला मिळाला नाही तर वोट चोरी झाली असे म्हणता येईल. पण, मतदानाचा अधिकार मिळाला, तर मतदार कसं काय म्हणेल माझ्या मताची चोरी झाली?
अधिकारीच सत्ताधाऱ्यांना मते टाकतात
चुकीच्या प्रश्नावर आपण लढलो तर लोकं साथ देत नाही, हे बिहारच्या निवडणुकीवरून दिसून आले आहे. मताच्या चोरीपेक्षा निवडणुकीच्या बुथमध्ये जे अधिकारी बसले आहेत, ते बसलेले अधिकारी प्रत्येक बुथमध्ये 100-150 मते सत्ताधारी पक्षाला टाकतात. आपण हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या मतांची चोरी होत नाही, तर सत्ताधारी पक्षाला अधिकची मते देण्याची परिस्थिती अधिकारी वर्ग निर्माण करत आहे. ते हे काम सहजपणे करतात, असे ते म्हणालेत.
सत्ताधाऱ्यांना वंचितची भरली धडकी
आंबेडकर पुढे म्हणाले, वंचितच्या मुंबईतील संविधान रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याची धडकी सत्ताधाऱ्यांना बसली आहे. आता आमच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी स्थानिक प्रश्नावर आंदोलन करायचे ठरवले आहे. त्यातून स्थानिक वॉर्डमध्ये समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठतोय. त्यामुळे सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून मोर्च्यात नोटीसा पाठवणे, दडपशाही करणे, मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले आहेत.
सरकार कुणाचेही असले तरी ते कार्यशील राहिले नाही. मी एवढेच म्हणेन की, त्यांनी कन्विक्शन रेट वाढवला तर ते लोकांना अत्याचार करण्यापासून थांबवेल. आपल्याला आता शिक्षा होण्यास सुरुवात झाली याची भीती त्यांच्या मनात निर्माण होईल, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही साधला निशाणा
प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरही निशाणा साधला. पंतप्रधान मोदी चीन आपला मित्र असल्याचा दावा करतात. तर लष्करप्रमुख चीन आपला शत्रू असल्याचे म्हणतात. या प्रकरणी कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित झाला तर मी लष्करप्रमुखांवर ठेवेन. मागील 15 वर्षांपासून देशात धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. त्यामुळे भारतासोबत एकही मित्र देश राहिला नाही, असे ते म्हणाले.