18000 कोटी खर्च, दीड तासांचा प्रवास 12 मिनिटात, जानेवारीपासून अडीच वर्ष खोदणार बोगदा; शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट


18000 Crore Worth Project: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा मार्गातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पुढील काही महिन्यांमध्ये सुरु होत आहे. बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लाॅन्चिंग शाफ्ट येथे ‘नायक’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनच्या (टीबीएम) जोडणीचे काम सुरू आहे. टीबीएमची जोडणी पूर्ण करून मार्च 2026 मध्ये ठाण्याकडून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या दुहेरी बोगद्याचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करून हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे ते बोरिवली अंतर केवळ 12 मिनिटांत पार करता येणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

जगातील पहिलाच प्रकल्प जो…

बोरिवली आणि ठाणे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एकूण सहा मार्गिकांचा 11.8 किमी लांबीचा ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला. यात 10.25 किमी लांबीचे दोन बोगदे असणार असून हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. जगात असा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. हा प्रकल्पासाठी अंदाजे 18 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीस खुला झाल्यास ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प ठाण्यातील (तिकुजीनीवाडी) आणि बोरिवली (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) यांना जोडणारा आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा (एसजीएनपी) भाग असलेल्या डोंगराखालून जातो. या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये पाहूयात…

लांबी आणि रचना: दोन समांतर तीन-लेन बोगदे (प्रत्येकी 11.8 किमी लांब, भूमिगत 10.8 किमी). प्रत्येक बोगद्यात आणीबाणी लेन आहे. व्यास 13.34 मीटर इतका असेल. भारतातील सर्वात मोठा व्यास असणारे बोगदे ठरतील. 

खोदकाम: 23 मीटर ते 60 मीटर खोलीपर्यंत. चार 13 मीटरच्या हेरेंकनेच्ट हार्ड-रॉक टीबीएम (टनेल बोरिंग मशीन) वापरल्या जात आहेत, ज्यात भारतातील सर्वात मोठी 13.34 मीटरची सिंगल शील्ड टीबीएम आहे. 

सुरक्षा वैशिष्ट्ये: वेंटिलेशन, अग्निशमन यंत्रणा, प्रत्येक 300 मीटरवर क्रॉस-पॅसेज, धूर शोधक, एलईडी मार्गदर्शन बोर्ड, प्रत्येक 500 मीटरवर एसओएस बॉक्स, स्पीड कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक देखरेख. 

खर्च: सुमारे 18 हजार कोटी रुपये . 

कंत्राटदार: मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. (एमईआयएल) आणि लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी). 

प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी): हिल इंटरनॅशनल. 

सद्यस्थिती (डिसेंबर 2025 पर्यंत):

सुरुवात: एप्रिल 2023 मध्ये करार, जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भूमिपूजन. 

प्रगती: 29 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे बाजूला सर्वात मोठ्या टीबीएमचा कटर हेड यशस्वीपणे खाली उतरवला गेला. टीबीएमची असेंबली सुरू झाली असून, ठाणे बाजूला पोर्टल तयार आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर बोरिवली बाजूला पायलिंग सुरू झाले. जानेवारी 2026 पर्यंत बोगदा खोदकाम सुरू होण्याची अपेक्षा. जानेवारी 2025 पर्यंत ७% काम पूर्ण होण्याची शक्यता. 

पूर्णत्वाची संभाव्य तारीख: मे 2028 किंवा 2029. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *