![]()
शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाची मर्यादा संपली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महारेलकडून पुलाच्या मजबूत पुनर्बांधणीसाठी मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शुक्रवारी नागपूर विधान भवन
.
शहरात माहिती तंत्रज्ञान पार्क विकसित करण्यासाठी स्थानिकांचा प्रतिसाद पाहून रोजगारक्षम प्रकल्प उभारावेत. अमृत योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या आणि पाणी टाकीचे काम तातडीने पूर्ण करावे. हनुमानगढी हे धार्मिक व पर्यटनस्थळ विकसित होत आहे. याठिकाणी स्थानिक बांधकाम साहित्य वापरावे. प्रकल्पांना टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. महापालिका मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले. पीएम मित्रा पार्क अंतर्गत नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीने जमिनीचे दर कमी करावेत. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती योजनेतून निधीची तरतूद करावी. छत्री तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. येथे सुविधा निर्माण करण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. यासाठी जिल्हा नियोजन समिती योजनेचा निधी वापरावा. शहरातील भूमिगत गटारांची संख्या वाढवावी. सध्या केवळ २० टक्के भागातच गटारे आहेत. स्वच्छता आणि आरोग्यासाठी गटार योजना तातडीने पूर्ण करावी.
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदारखोडके, सुलभा खोडके, रवी राणा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल हे हजर होते.
ऐतिहासिक नेहरू मैदान कायम ठेवण्याचे निर्देश शहरातील विकासकामे करताना नेहरू मैदान कायम ठेवण्यात यावे. शहरातील श्री अंबादेवी व श्री एकविरादेवी मंदीर परिसर वर्दळीचा आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी लक्षात घेता, प्रस्तावित विकासकाम पूर्ण करताना पहिले प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून रस्ते व नाले, सांडपाणी व्यवस्थापन, मंदीरा लगतची दुकाने, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, वाहन पार्किंग व्यवस्था आदी बाबी लक्षात घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.