तुकाराम मुंढेंच्या निलंबनाच्या मागणीवर सरकारचा निर्णय झाला, विधानसभेत केलं जाहीर


Corruption Allegations against Tukaram Munde: नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडत असून, यावेळी भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसंच त्यांना निलंबित करण्याची मागणीही केली होती. तुकाराम मुंढे कोविडच्या काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले. त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार झाले असा आरोपही कृष्णा खोपडे यांनी केला होता. दरम्यान याप्रकरणी राज्य सरकारने सभागृहात माहिती दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चीट’

भाजप आमदार कृष्णा खोपडे व प्रवीण दटके यांनी स्मार्ट सिटी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट मिळाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसमेत हे जाहीर केलं. 

नेमके काय आरोप होते?

“तुकाराम मुंढे कोविडच्या काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले. सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार केले. एखाद्या साइटवर गेले तर मीडियाला माहीत होतं, मात्र संबंधित अधिकारी घरी झोपून राहत होता. तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटीचे अधिकार दिले नव्हते. त्यांनी 20 कोटी रुपयांच्या चेकवर स्वतः सही केली आणि बिल्डरच्या घशात टाकले. त्यावेळी महापौर असलेले संदीप जोशी आणि भाजप गट नेते संदीप जाधव यांनी बँकेच्या पुराव्यासहित सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि एफआयआर दाखल झाला,” असं कृष्णा खोपडे यांनी म्हटलं होतं. 

“स्मार्ट सिटीत महिला अधिकारी होते त्यांनी सही करण्यास मनाई केली, त्यावेळी मुंडे यांनी त्या महिला अधिकाऱ्यांना टॉर्चर केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या आईएएस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि देशमुख गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नाही,” असा दावा त्यांनी केला होता. 

“माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागितली. त्यांना अधिकार नसतानाही पाच वर्षे त्या पदावर दाखवण्यात आलं, परंतु तसं असतानाही ते आदेश रद्द करण्याचे मागणी आम्ही केली.  आम्ही या विरोधात लक्षवेधी दाखल केलेली आहे मुंडे यांनी करोना काळात कोविडच्या काळात नागपूरचा कसा सत्यानाश केला. आता आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांना ताबडतोब निलंबित करावं आणि त्यांची चौकशी मुख्य सचिवाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी केली आहे,” असंही त्यांनी म्हटलं होतं. 

लक्ष्यवेधीनंतर धमकीचे फोन आल्याचा आरोप

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप केला होता. “तू अभी तक जिंदा कैसे है!’, असं धमकी देणाऱ्याने म्हटल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 8 तारखेला रात्री 10.45 वाजता धमकीचा फोन आल्याचा दावा त्यांनी केला. 

“तु कृष्णा खोपडे है क्या, तुने तुकाराम मुंढे के खिलाफ बोला, तू अभी तक जिंदा है क्या?, असं त्याने म्हटल्याचा दावा आमदार खोपडे यांनी केला होता. नागपूर पोलीस आयुक्त आणि बर्डी पोलिसांना त्यांनी याबाबत माहिती दिली 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *