Brahmos Horse: सारंगखेडा घोडेबाजारात 15 कोटींचा ब्रम्होस चर्चेत आहे. त्याच्या मालकाला तो विकायचा नाही म्हणून त्याची 15 कोटीना किंमत ठेवली आहे. विशेष म्हणजे त्याला 8 कोटी रूपायांची बोली लागली आहे.कसा आहे हा ब्रम्होस घोडा, आणि का आहे त्याची इतकी किंमत पाहूयात.
ब्रम्होस नाव ऐकलं तर आपल्यासमोर येतात वायुदलातील लढाऊ. मात्र आज अशा एक ब्रम्होसबद्दल जाणून घेऊया ज्यांनी अनेकांना भुरळ घातलीये. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झालेला हा काळा, रुबाबदार आणि लयबद्ध चालणारा घोडा म्हणजे ब्रम्होस. काय आहे यात खास? जाणून घेऊया.
ब्रम्होस या घोड्याची किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्काच बसेल.ब्रम्होसची किंमत आहे 15 कोटी रुपये.या 15 कोटींच्या ब्रम्होसला पाहण्यासाठी अश्वप्रेमींची गर्दी होतेय. गुजरातच्या पाटण येथून ब्रम्होस सारंगखेडा घोडेबाजारात दाखल झालाय.
कपाळावरचा आकर्षक पांढरा पट्टा आणि मारवाडी जातीची उठावदार ठेवण हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य.गुजरातच्या नागेश देसाई यांचा हा ब्रम्होस घोडा.पुष्कर बाजारात या घोड्याला 8 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती. मात्र देसाई कुटुंब ब्रम्होसला विकायला तयार नाहीत.36 महिन्यांचा, तब्बल 63 इंच उंचीचा ब्रम्होस आज देशातील टॉप अश्वांपैकी एक मानला जातो. याच्या खानपानाची काळजीही तितकीच विशेष—दिवसभरात तब्बल 15 लिटर दूध, तसेच अश्वतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक खाद्य.देखभालीसाठी दिवसभर स्वतंत्र मजूर, मसाज, ग्रुमिंगची विशेष व्यवस्था असते.त्यामुळेच देशभरात झालेल्या अनेक अश्व स्पर्धांमध्ये ब्रम्होस नंबर वन ठरला आहे
सारंगखेड्याच्या या ऐतिहासिक घोडेबाजारात यंदा ब्रम्होसने ख-या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा रुबाब, किंमत आणि तुफान लोकप्रियता यामुळे हा घोडा बाजाराचा शोस्टॉपर ठरला आहे. ब्रम्हामोस हा ब्लड लाईन घोडा आहे. अजून त्याची पुर्ण वाढ झालेली नाही. जसा तो वाढेल तसं अधिक रुबाबदार होईल.
ब्रम्होसच्या ब्रिडींगमधून आतापर्यंत 10 पिलं जन्माला आलीयेत. त्यांनाही लाखोंच्या बोली लागल्यात. म्हणूनच हा घोडा भविष्यात केवळ हॉर्स ब्रीडिंगसाठी वापरण्याचा निर्णय देसाई कुटुंबाने घेतला आहे.पण ब्रमोस सध्या अश्व प्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडतोय.
FAQ
१. प्रश्न: ब्रह्मोस घोडा नेमका कोणता आणि त्याची किंमत किती आहे?
उत्तर: ब्रह्मोस हा मारवाडी जातीचा काळा, रुबाबदार घोडा आहे, जो गुजरातच्या पाटण येथील नागेश देसाई यांचा आहे. त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे. पुष्कर बाजारात त्याला ८ कोटींपर्यंत बोली लागली होती, तरीही मालक विकायला तयार नाहीत.
२. प्रश्न: ब्रह्मोस घोड्याची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर: हा ३६ महिने वयाचा घोडा असून त्याची उंची ६३ इंच आहे. कपाळावर आकर्षक पांढरा पट्टा, मारवाडी जातीची उठावदार ठेवण आणि ब्लड लाईन असल्याने तो देशातील टॉप घोड्यांपैकी एक मानला जातो. अनेक अश्व स्पर्धांमध्ये तो पहिला क्रमांक पटकावतो. अद्याप पूर्ण वाढलेला नसल्याने पुढे आणखी रुबाबदार होईल.
३. प्रश्न: ब्रह्मोसची देखभाल आणि भविष्यातील योजना काय आहे?
उत्तर: त्याला दिवसाला १५ लिटर दूध आणि पौष्टिक खाद्य दिले जाते. मसाज, ग्रुमिंग आणि स्वतंत्र मजूर यांची विशेष व्यवस्था आहे. ब्रह्मोसच्या ब्रिडिंगमधून आतापर्यंत १० पिले जन्मली असून त्यांनाही लाखो रुपयांच्या बोली लागल्या. भविष्यात देसाई कुटुंब हा घोडा फक्त ब्रिडिंगसाठी वापरणार आहे. सध्या सारंगखेडा घोडेबाजारात तो सर्वांचे लक्षवेधक केंद्रबिंदू बनला आहे.